SUCH SMALL BUSES TAKE U TO CHANDANWADI FROM PAHELGAM. THE YATRA BEGINS FROM CHANDANWADI. पहेलगामहून चंदनवाडी जाण्यासाठी अशा बस असतात.
1ST PLEASANT SIGHT OF GREENERY! TWO HORSES CAN ALSO B SEEN. हिरवळीचे पहिले दर्शन. खाली कोपऱ्यात दोन घोडेही दिसत आहेत.
SUCH SMALL MANDIR WITH LIGHTING CAN BE SEEN IN EVERY LANGAR. प्रत्येक लंगरमध्ये लाईटींग केलेले असे देवघर असते.
WHO'S THIS MAN WITH STICK IN HIS HAND???? OH I!!! IT'S ME! कोण आहे हा काठी टेकू इसम ? अहो ही तर आमची पहिली छबी! थकलेली...पिचलेली...
NOW STARTS THE 1ST STAGE OF PISSU-TOP. THIS VERY 1ST STAGE IS THE MOST DIFFICULT PART OF YATRA. पिस्सूटॉपच्या पहिल्याच टप्याला प्रारंभ. हाच टप्पा सर्वांधिक खडतर असतो.
THE ROAD AHEAD IS FULL OF SUCH ROCKS & IT'S VERY DIFFICULT TO CLIMB. पुढे दिसणारी वाट प्रचंड खडकाळ, खडतर आहे.
FOR HORSES ALSO SUCH ROUTE IS NOT EASY AT ALL. EVEN IF U R ON THE BACK OF HORSE, U CAN NEVER FEEL COMFORTABLE. THERE IS ALSO A VERY SMALL GAP BETWEEN TWO HORSES. अशा मार्गावरून घोडे सुद्धा मोठ्या कष्टाने वाटचाल करीत असतात. त्यावर बसलेल्यांचेही "हाल'च असतात. दोन यात्रेकरू किंवा दोन "घोडेस्वारां'मध्ये फार कमी अंतर असते.
ON THIS ROUTE I COULD WALK ONLYU 4 STEPS. I STOPPED THE COUNTING & GAVE MY SACK (OF NEARLY 20KG) TO pitthu. PITTHU MEANS KASHMIRI BOY IN FORM OF PORTER. HE EARNS FOR THE WHOLE YEAR IN THE YATRA. अशा मार्गावरून सुरवातीचे चार पावले (फक्त आणि ती सुद्धा मोजून) टाकल्यानंतर आमची सॅक "पिठ्ठू'ला दिली. स्वतःच्या शरीराचा भार स्वतःच वाहायचे ठरविले. "बाय-द-वे' पिठ्ठू म्हणजे यात्रेकरूंचे सामान वाहणारा मुलगा - भारवाहक काश्मीरी कुमार!
THOUGH APART FROM MY OWN BODY, I HAD NO LOAD TO CARRY, STILL THE ROUTE WAS DIFFICULT. WHEN I GAINED SOME HEIGHT & LOOKED DOWN, THEN I SAW THE FELLO `BHOLES' TRYING & TIRING WHILE WALKING. अशाप्रकारे स्वतःचा भार (सामानरहीत!) वाहून वर जात असताना खाली कटाक्ष टाकला, तेव्हा कष्टप्रद वाटचाल करणाऱ्या यात्रेकरूंना पाहून अंगावर काटा आला.
OH GOD! SO THOUGH I WAS CLIMBING, AFTERALL IT WAS A VALLEY LIKE THING... अरे बापरे! म्हणजे आपण अशा दरीतून आ लो होतो तर... फोटोमध्ये काही माणसे सुद्धा दिसत आहेत.
1ST LANGAR. AFTER THE COMPLETION OF PISSU-TOP ALL `BHOLES' R EXHAUSTED. THEY लंगरचे पहिले दृश्य! पिस्सूटॉपचा पहिला टप्पा पार केल्यानंतर थकलेले यात्रेकरू लंगरमधील जेवणावर ताव मारतात.
1ST DARSHAN OF ICE! ICE ON THE TOP OF THE HILL. बर्फाचे पहिले दर्शन! डोंगराच्या माथ्यावर दिसणारा पांढराशुभ्र बर्फ!!
SO FAR WE WERE USED TO C ONLY THE WATERFALL. धबधबा फक्त पाण्याचा असतो, हा "घाटी' लोकांचा समज..पण इथे तर बर्फाचा धबधबा!!!! ता.क. या बर्फाखालून थंडगार पाणी वाहात असते. खाली येताना बर्फ वितळत असतो.
NO DOUBT SUCH ICE-FALLS R PLEASANT. BUT THE ROAD AHEAD IS VERY VERY DIFFICULT. असे बर्फाचे डोंगर पाहून आनंद होतोच, पण पुढील मार्ग पाहिल्यानंतर यात्रेकरू "गार' पडल्याशिवाय राहात नाही....!!!!
FROM JOJPAL STAGE THE ICE PERCANTAGE INCREASES WITH THICKNESS. NATURALLY THE WEATHER BECOMES BITTING COLD & CHILLY. जोजपालपासून जसे पुढे जाल, तसा बर्फ दाट होत जातो आणि मग गारठा सुद्धा वाढत जातो आणि हा गारठा तुम्हाला गोठवून टाकत जात असतो....
LANGAR AHEAD OF JOJPAL STAGE. जोजपाल येथून थोडे पुढे असलेल्या लंगरचे दृश्य.
WATER MELTED FROM ICE FLOWING THROUGH THE VALLEY. THE BIG HILLS R ALSO SEEN. NOW U R WATCHING THE REAL BEAUTY!!! मार्गावरील एक दरी, बाजूला डोंगर आणि मधून वाहणारा वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचा झरा.
THOUGH THE SCENE-SCENERY IS BEAUTIFUL, SUCH IS NOT CASE WITH THE ROUTE. U HAVE 2 DRAG URSELF WITH GR8 DETERMINATION. पुन्हा एकदा खडकाळ, खडतर मार्ग. कष्टप्रद वाटचाल कायम. "बम-बम-भोले'!!!!!
AFTER THE HALT & GOOD SLEEP AT JOJPAL LANGAR, I BECAME FRESH. SO DARED TO WALK FEW METERS. BUT WAS EXHAUSTED. SO WITHOUT THINKING MUCH I DECIDED TO HIRE HORSE. जोजपालला थंडगार पाण्याचे अंघोळ केल्यामुळे ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे थोडी वाटचाल जिद्दीने केली. पण थोड्याच अंतरावर गारठलो! मग मात्र म्हटले आता "अश्वा'वर आरूढ होण्याशिवाय पर्याय नाही...
1ST DARSHAN OF SHESHNAG zeel!!! I DON'T KNOW HOW GOOD THIS PHOTO IS, BUT THE ACTUAL zeel IS MUCH-MUCH-MUCH MORE BEAUTIFUL COMPARED TO PHOTO. ACTUALLY baba barfani ki goofa IS THE ULTIMATE POINT OF AMARNATH YATRA, BUT FOR DEVOTED SHIVA-LOVERS darshan OF THIS zeel IS QUITE AN EXPERIENCE. IT DOES TOUCHES UR HEART. शेषनाग झीलचे पहिले दर्शन! हा फोटो किती चांगला आला आहे किंवा बघणाऱ्याला किती चांगला वाटेल, याचा अंदाज नाही. मात्र जे काही दिसतेय त्यापेक्षा कित्येक कोटी पटींनी रमणीय असे हे सरोवर आहे. शंकराने येथे नाग सोडला होता. "बाबा बर्फानी' अर्थात गुहेतील शिवलिंग हा अमरनाथ यात्रेचा परमोच्च बिंदू असला तरी मला या "शेषनाग झील'ने अक्षरशः मोहीत केले. येथे मुक्काम करण्यासारखी स्थिती नाही. मात्र या पुढील जन्मी या "झील'मधील किमान किटकाचा जन्म मिळाला तरी चालेल, अशीच प्रार्थना करावीशी वाटली....
ICE, ICE & ONLY ICE!!! बर्फ, बर्फ आणि बर्फ!!!
HILL FULL OF ICE AT 1 SIDE, WHILE BARREN HILL ON THE ANOTHER SIDE. U HAVE 2 KEEP TREADING, DRAGGING UR FEET. एकीकडे बर्फाचा, तर दुसरीकडे बोडका डोंगर...मधल्या वाटेवरून पुढील वाटचाल कायम...
HILL OF BLACK ROCKS. ICE STARTS TO SATURATE WHERE IT GETS THE PLACE. काळ्याकुट्टा दगडांच्या अशा डोंगर-कम-कड्यावर जागा मिळेल तिथे साचलेला बर्फ.
ANOTHER BEAUTIFUL PHOTO OF SHESH-NAG zeel. "शेषनाग झील'चे शांत, सुंदर पाणी दाखविणारे मनमोहक छायाचित्र!
AS U PROCEED, U DO LOOK BACK TO HAVE YET ANOTHER LOOK AT SHESHNAG zeel. NOW U BECOME DEJECTED, AS U R GOING AWAY FROM THIS TREMENDOUS zeel. "शेषनाग झील'चा मोठा "व्ह्यू'. आणखी थोडे पुढे जात असल्याने म्हणजे "शेषनाग झील'पासून लांब जात असल्यामुळे फार वाईट वाटत होते...
MILITARY POST OF INDIAN ARMY STATIONED NEAR SHESHNAG zeel. AMARNATH YATRA IS POSSIBLE THANKS TO OUR BRAVE SOLDIERS. शेषनाग येथून थोड्या अंतरावर असलेली "मिलीटरी पोस्ट'. हे जवान आहेत म्हणूनच अमरनाथ यात्रा होऊ शकते. त्यांना "हाय' करून पुढे रवाना झालो.
ICE, ICE, ICE & MORE ICE!!! बर्फ-बर्फ-बर्फ आणि फकस्त बर्फच!!!!
TENTS FIXED FOR yatris NEAR POSHPATRI. WHEN U C ICE ON THE ADJACENT HILLS, U STARTS SHIVERING AT THE THOUGHT OF TAKING HALT & SLEEP IN 1 OF THESE TENTS. पोषपत्री येथे यात्रेकरूंना थांबण्यासाठी एवढे भरपूर "टेंट' लावलेले असतात. पण बाजूचा बर्फ पाहिल्यानंतर येथे मुक्काम करणाऱ्यांचे काय "हाल' होत असतील याची नुसती कल्पना करा....आली ना हुडहुडी भरून!!!!!!!!!
EVERYWHERE ICE & ICE ONLY..WHETHER ITS RIGHT-LEFT-BACK OR BENEATH..... आगे बरफ, पिछे बरफ, बीचमे बरफ, नीचे बरफ, दाये बरफ, बाए भी बरफच!!!!!!!!!
OH GOD? HAVE WE LOST THE ROUTE? ISN'T THIS SWISS ALSP? THIS YEAR THERE WAS RECORD-BREAK ICEFALL IN KASHIMR VALLEY. SO THE ROUTE WAS GIVING TOUGH FIGHT TO SWISS-ALPS अरे आपण चुकलो तर नाही ना? हा तर "स्विस आल्प्स' वाटतोय की!!!! यंदा "रेकॉर्डब्रेक' बर्फ पडल्यामुळे पहलगामचा मार्ग असा "आल्प्समय' झाला होता. हे नेत्रसुखद दृश्य आयुष्यभर विसरू शकणार नाही.
AS U PROCEED, U AGAIN DOUBT WHETHER THIS IS ALPS? पुन्हा स्वतःला चिमटा काढला आणि खात्री करून घेतली...की आपण "आल्प्स'ला तर चाललो नाही ना.....
SHIV SEVAK SANGHA OF DELHI ORGANISED THIS LANGAR AT POSHPATRI. U GET EVEN NOODLES, CHINESE HERE. THERE WAS ALSO SOUTH INDIAN-IDLI, DOSA, ETC. IT'S QUITE A TREAT FOR FOOD-LOVERS. BUT CONSIDERING THE DEGREE OF DIFFICULTY OF AMARNATH YATRA & THE WEATHER, I WILL ADVISE TO EAT VERY LESS. पोषपत्री येथील "शिव सेवक, दिल्ली' यांचा भंडारा. येथे अगदी "नूडल्स' सुद्धा मिळतात!!! खाणाऱ्यांसाठी पर्वणी. पण हवामान, यात्रेची "काठीण्य पातळी' (म्हंजे-डिग्री ऑफ डिफीकल्टी) पाहिल्यावर जरा बेतानेच खाल्लेले बरे असते, असा सल्ला द्यावासा वाटतो.
NOW U COME TO KNOW HOW OUR SOLDIERS SURVIVE IN TAXING CONDITIONS. आपले जवान यात्रेकरूंसाठी किती खडतर परिस्थितीत राहतात याची कल्पना देणारे छायाचित्र.
THE ROUTE TOWARDS PANCHTARNI IS FULL OF UPS & DOWNS.... पंचतरणीला जाणारा मार्ग सुद्धा असा चढ-उताराचा असतो.
PHOTO TAKEN FROM THE SHOULDER OF yatri SITTING ON ANOTHER HORSE. I JUST THOUGHT ----kash is yatri ka khanda mera bhi bojh oothata.... एका यात्रेकरूच्या खांद्यावरून "अँगल' घेत काढलेले छायाचित्र. "काश इस भोले का कंधा मेरा भी बोझ उठाता....' (चंदनवाडीहून चालायला सुरवात केल्यानंतर प्रत्येक यात्रेकरू "भोले' झालेलो असतो...मग तो राजा असो किंवा रंक. प्रत्येक जण एकमेकाला "भोले' या नावानेच हाक मारत असतो. तुमचा आवाज कितीही किरटा, गेंगाणा असला तरी "भोले' म्हणताना समोरच्याच्या कानावर "आयडीया सारेगमप...' सारखा मंजुळ स्वर पडतो....माझा आवाज ओळखणाऱ्यांना म्हणजे ऐकलेल्यांना हा दाखला पटल्याशिवाय राहणार नाही!!!!!
AS U KEEP WALKING, SUCH HILLS FULL OF ICE GREET U. NOW THE HEIGHT OF HILLS & THE PERCENTAGE OF ICE KEEPS ON INCREASING. SO U BECOME EAGER TO HAVE 1ST GLIMPSE OF baba barfani ki goofa. जसे पुढे जाल तसे बर्फमय डोंगर दिसतात. डोंगरांची उंची आणि बर्फाचे प्रमाण वाढत जाते. थकवा येत असतो, पण असे डोंगर पाहिल्यावर उत्साह आल्याशिवाय राहात नाही. "बाबा बर्फानी की गुफा' आता नेमकी किती लांब राहिली, अशी उत्सुकता निर्माण होत असते.
ROOK JAANA NAHI..TU KAHI THAKKE... रूक जाना नही, तू कहीं थकके...
THE ICEFALL AT NIGHT NEAR baba barfani ki goofa. IN SUCH -ICY- ATMOSPHERE I STAYED FOR 2 NIGHTS & ALSO TOOK BATH WITH ICE-MELTED-WATER ONCE.. "बाबा बर्फानी की गुफा' येथील रात्रीचे दृश्य. रात्री बर्फवृष्टी होते आणि बर्फाचे असे धर साचतात. अशा बर्फाळ वातावरणात मी दोन रात्री मुक्काम केला. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ सुद्धा केली!!!
THE STAYING ARRANGEMENTS NEAR goofa. ON THE FRONT SIDE THERE IS SHOP WHERE U GET POOJA-PACKETS, prasad, PHOTOS, LOCKETS, KEY-CHAINS, ETC. WHILE AT THE BACK SIDE, THERE IS TENT. IN EACH TENT NEARLY 20 PILGRIMS CAN STAY. NOW JUST LOOK CLOSELY & CHECK WHERE BOTH THE SHOP & TENT ARE ERECTED ON? IT'S ICE WITH THICKNESS OF ABOUT 1 TO 2 FOOT. "बाबा बर्फानी की गुफा' येथील "निवास व्यवस्था'. समोर दुकान असते, जेथे पुजा साहित्य, प्रसाद, देवाचे फोटो, आदी गोष्टी मिळतात. मागे "टेंट' अर्थात तंबू असतो. तेथे साधारण 20 माणसांची राहण्याची व्यवस्था असते. आता जरा नीट बघा आणि सांगा बरे दुकान आणि तंबू कशावर उभा आहे ते...दोन्ही वास्तूंचा पाया आहे बर्फाचा. बर्फाचे असे दीड-दोन फूट कट्टे असतात.
NOW THE RETURN JOURNEY. (DUE TO TIGHT SECURITY, MOBILE, CAMERAS ARE NOT ALLOWED NEAR goofa. SO COULD NOT TAKE PHOTOS OF SHIGLING, GOOFA.) आता परतीचा मार्ग. (गुफा, शिवलिंग यांचे फोटो काढता आले नाहीत. अतिरेक्यांच्या हल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अंतिम टप्यातील पायऱ्यांच्या पुढे कॅमेरा, मोबाईल नेण्यास मनाई असते.)
FOR THE RETURN JOURNEY ALSO, I DECIDED TO HIRE HORSE. परतीच्या टप्यासाठी सुद्धा घोडाच करायचे ठरविले. कारण हा मार्ग सुद्धा "भयंकर' असतो.
THE ROUTE IS VERY-VERY LONG. U WONDER WHEN WILL IT END? पायवाटेवरून नुसते डोळे फिरवा, गरगरल्याशिवाय राहणार नाही! परतीचा मार्ग "ही वाट दूर जाते,' या लोकप्रिय गाण्याच्या पहिल्याच ओळीची आठवण करून देते. प्रचलित गाण्याचा आशय आणि अर्थ येथे लागू होत नाही. फक्त म्हणत राहायचे, "ही वाट दूर जाते...'
RETURN ROUTE HAS ALSO SOME LANGARS.
THERE IS MILITARY POST AT SOME POINTS.
VIEW OF LANGAR.
ICE-WATER FALLS!
ENLARGE THE PHOTO & U WILL FIND HELICOPTER.
THE LONG-LONG ROAD.